मिटमिटा सफारी पार्क होणार हिरवेगार

Foto
प्राण्यांच्या सावलीसाठी लावणार १२ फूट उंचीची १५० झाडे
प्राधिकरणाकडे प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर, 1 (सांजवार्ता ब्युरो): स्मार्ट सिटी ने अभियानाअंतर्गत मिटमिटा येथे २ १०० एकरांत साकारल्या जाणाऱ्या न नव्या सफारी पार्कमध्ये दिवाळीनंतर , प्राणी स्थलांतरित करण्याची तयारी 5 महापालिकेने केली आहे. प्राण्यांना -. उन्हाचा त्रास होऊ नये आणि त्यांना नैसर्गिक सावली मिळावी, 1 यासाठी नर्सरीमधून थेट १० ते र १२ फूट उंचीची १५० तयार झाडे वे लावली जाणार आहेत. येत्या १५ द सप्टेंबरला हैदराबाद मुक्तिसंग्राम 5 दिनाचे औचित्य साधून या वृक्षांचे रोपण केले जाईल, अशी माहिती - महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
T
▶ सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय मिटमिटा येथे स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (सेंट्रल झू ऑथॉरिटी) यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यांच्याकडून अंतिम परवानगी मिळताच स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. साधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत प्राणिसंग्रहालयाचे स्थलांतर पूर्ण होईल, असा विश्वास अमोल येडगे यांनी व्यक्त केला.
प्राणिसंग्रहालय सिद्धार्थ उद्यानातील महापालिकेचे लवकरच मिटमिटा येथील सफारी पार्कमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. त्यासाठी सध्या या परिसरात महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण सुरू आहे. मात्र, नव्याने लावलेली रोपे मोठी
होऊन तेथे नैसर्गिक वातावरण तयार होण्यासाठी वेळ लागणार आहे. प्राणिसंग्रहालयाचे स्थलांतर झाल्यानंतर प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि त्यांना सावली मिळावी, यासाठी महापालिकेने थेट मोठी झाडे लावण्याचा निर्णय घेतला.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions